देशमहाराष्ट्र
वरळी डोम येथे मराठी विजयी मेळावा

वरळी डोम येथे मराठी विजयी मेळावा
होत आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी तुफान गर्दी झाली आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत.

वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर जमलेले कार्यकर्ते आत घुसण्यासाठी अट्टहास करत आहेत. त्यांना आवरताना पोलिसांनाही नाकीनऊ येत आहेत. अनेक लोक त्यांच्याकडे असलेला पास दाखवत आहेत.

वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. नागरिकांना आत जाण्यासाठी रेटा सुरु आहे. अखेर गेट उघडल्यानंतर लोक आत पळत सुटले.
वरळी डोमच्या आसपास नुसता जनसागर उसळलेला दिसत आहे. नजर जिथवर जाईल तिथपर्यंत लोकच लोक दिसत आहेत.

हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्याचा विजय म्हणून आज मराठी विजयी मेळावा होत आहे. 18 वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे एका मंचावर दिसणार आहेत.





