श्रमसाफल्य घरेलू कामगार संघटने अंतर्गत जागतिक घरेलू कामगार दिवस उत्साहात संपन्न

श्रमसाफल्य घरेलू कामगार संघटने अंतर्गत जागतिक घरेलू कामगार दिवस उत्साहात संपन्न
अमरावती दि. 17 जून 2025
स्थानिक राहुल नगर, अमरावती येथे श्रमसाफल्य घरेलू कामगार संघटने अंतर्गत जागतिक घरेलू कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपस्थित मा.शितल वाघमारे यांनी घरेलू कामगारांसाठी कोणकोणत्या शासकीय योजना आहेत तसेच त्या योजनांची अंमलबजावणी लवकर करण्यात यावी यासाठी महिलांना आणि सरकारला आव्हान करण्याचे गरज आहे याविषयी मार्गदर्शन केले.
मा. नीलिमा भटकर यांनी महिलांना कायदेविषयक अंतर्गत माहिती दिली तसेच घरेलू कामगारांना कायदेविषयक ज्ञान असणे महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच मा. प्रीती मून(समुपदेशक जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती) यांनी घरेलू कामगार महिलांना काम करताना होणाऱ्या आरोग्याच्या समस्या या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला उपस्थित मा. भाग्यश्री खडेकार अध्यक्ष (श्रमसाफल्य घरेलू कामगार संघटना ) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना १६ जून हा जागतिक घरेलू कामगार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. घरेलू कामगारांच्यारां काही प्रमुख मागण्या आहेत. कामगारांची नोंदणी ही त्वरित चालू करावी तसेच घरेलू कामगारांसाठी त्रिपक्षीय मंडळामध्ये घरेलू कामगारां च्या संघटनांना समाविष्ट करण्यात यावे. राज्यात तालुका पातळीपर्यंत घरेलू कामगारांना नोंदणीकृत करणारी सक्षम यंत्रणा स्थापन करावी. त्याचप्रमाणे घरेलू कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती ,घरेलू कामगारांना अपघाती विमा.. होता.”घरकाम हे काम आहे,घरकामगार हा कामगार आहे.”
सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशात श्रम व रोजगार मंत्रालयाला दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी आणि घरेलु कामगार यांच्यासाठी राष्ट्रीय घरेलु कामगार सामाजिक सुरक्षा कायदा तयार करावा,किमान वेतन योजना घर कामगारांना लागू करा, आजारपणाची व आठवडी सुट्टी मिळावी यासाठी घरकामगार महिलांनी आपले विचार मांडले. जागतिक अर्थव्यवस्थेत महिला श्रमिक यांचे महत्वाचे योगदान आहे . त्यातही घरेलु कामगारांचे महत्व आहे.आज डीजीटल युगात वेळ कमी मिळत आहे.त्यामुळे भाजी पोळी किंवा घरकाम करायला माणूस लागतो.त्या माणसाला कामाचे दाम मिळाले पाहिजे.ते मिळत नाही .आपण सर्व घरकामगार महिलांनी एकत्र होऊन आपले अधिकार प्राप्त केले पाहिजे.वेतन मिळून घेतले पाहिजे.बोनस ,पेन्शन साठी घरेलु कामगार महिलांनी संघटित होऊन संघर्ष करण्याचे आवाहन केले.
घरेलु कामगार दिनानिमित्त केक कापून व घरेलु कामगारांना त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने जोशना वानखडे, शुभांगी वरघट, ईश्वरी तायवाडे, सुजाता तायडे, राणी बनोदे, पल्लवी खंडारे, सुनिता धाकडे, छाया टेंभुर्णे, गीता धरमपल्ली आणि परीसरातील बहुसंख्येने महिलांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे संचालन ईश्वरी तायवाडे व आभार शुभांगी वरघट यांनी केले .
https://youtube.com/@amravatinews24?si=ll8FW_EPq9bLg5kZ




