महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची बडनेरा शहर शाखा कार्यकारिणी गठित करण्यात आली

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची बडनेरा शहर शाखा कार्यकारिणी गठित करण्यात आली
.
बडनेरा प्रतिनिधी जयश्री चांडक दि. 6 जुलै 2025 स्थानिक रमाबाई आंबेडकर नगर माताफैल बडनेरा येथे दिलीप लाडे यांचे निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाला मा. प्रफुल्ल कुकडे अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष महा.अंनिस यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बडनेरा शहर शाखेची कार्यकारिणी निवडण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात चळवळ गीताने झाली, सर्वांनी परीचय दिला.
बडनेरा शहर शाखा कार्यकारिणी मध्ये
अध्यक्ष – रहेमतशहा खालीकशहा, उपाध्यक्ष – मदन खंडारे, कार्याध्यक्ष -दिलीप लाडे, प्रधान सचिव – भूमिका पहुरकर, कार्यवाह वैज्ञानिक शिक्षण प्रवाह विभाग- महादेव मेश्राम, कार्यवाही महिला सहभाग विभाग – कल्पना हरणे, कार्यवाह सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग- वर्षाताई पकडे, कार्यवाह विविध उपक्रम विभाग – उमाताई इंगोले, कार्यवाहक कायदेविषयक व्यवस्थापन विभाग- ऍड .प्रिया वि. भगत यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला सर्व सदस्य गण प्रामुख्याने उपस्थित होते त्यामध्ये किरण दुपारे, सीमा मडामे, कुंदा मेश्राम, सरिता लाडे, सारिका राहुल, मोनाली सदावर्ते, मनाली पहूरकर, वृंदा आगलावे, प्रकाश राहुल,चेतन आगलावे, कुमुद मेश्राम, अंजली मोकाशे, गोपाल वानखडे, राजेश पारस्कर, पुष्पा जाधव, वंदना पवार, आदींची उपस्थिती प्रामुख्याने होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन दिलीप लाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन महादेव मेश्राम यांनी केले.



