ग्रामीण घरकुल लाभार्थ्यांना वाढीव ५०/- हजारांचा निधी कधी वितरीत करणार ?
४ एप्रिल २०२५ चा शासन निर्णय खरा की खोटा ?

ग्रामीण घरकुल लाभार्थ्यांना वाढीव ५०/- हजारांचा निधी कधी वितरीत करणार ?

४ एप्रिल २०२५ चा शासन निर्णय खरा की खोटा
पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकार ची महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत टप्पा दोन मधील ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना निधी कमी पडतं असल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य हिश्शयातुन ५०/- हजार वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी ४ एप्रिल २०२४ रोजी शासन निर्णय पारित केला आहे परंतु ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आजपर्यंत ही वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही पंचायत समिती अचलपूर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या बाबतीत काहीचं माहिती नाही काही काही ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांना लेखी स्वरूपात पत्र देऊन या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी सुद्धा काहीच उत्तर दिले नाही असे असताना जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांच्या वतीने युवाशक्ती ग्रामविकास संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत टप्पा दोन मधील लाभार्थ्यांना वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे याप्रसंगी युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे अध्यक्ष इमरान पठाण प्रामुख्याने उपस्थित होते तसेच युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घाटे उपाध्यक्ष पवन पाटणकर जिल्हा उपाध्यक्ष मुकेश गावंडे, सहसचिव महेश गजभिये व गौरखेडा कुंभी तालुका अचलपूर येथील घरकुल लाभार्थी संतोष भालेराव व गावातील सामाजिक कार्यकर्ते नितीन शिंदे, संतोष माकोडे, जय शिंदे, बंटी ठोकने आणि इतर अनेक नागरिक हजर होते




