महाराष्ट्र

Kolhapur : कोल्हापुरात एकनाथ शिंदेंची ‘जादू’, एकाच वेळी काँग्रेस-भाजप आणि ताराराणी आघाडीला धक्का; दोन माजी महापौर, 20 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Eknath Shinde : या आधी शारंगधर देशमुखांनी काँग्रेसच्या सतेज पाटलांची साथ सोडत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. आताही 20 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात एकाच वेळी काँग्रेसचे सतेज पाटील, भाजप आणि ताराराणी आघाडीला धक्का दिला आहे. या तीनही गटातील दोन माजी महापौर आणि 20 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत या सर्वांनी मुंबईत हा पक्षप्रवेश केला.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरवर लक्ष केंद्रीत केलं असून अनेक मोठ्या नेत्यांना गळाला लावलं आहे. आधी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे कट्टर समर्थन शारंगधर देशमुखांना त्यांनी फोडलं. त्यानंतर आता तब्बल 20 नगरसेवकांना पक्षात घेतलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस तसेच भाजपसमोर शिंदेंचं मोठं आव्हान असणार आहे.

सतेज पाटलांना धक्का

कोल्हापूर महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना शिंदेंनी काँग्रेसचे प्रमुख मोहरे फोडल्याने तो सतेज पाटलांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. शारंगधर देशमुख आणि अश्किन आजरेकर यांच्यासह अनेकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आगामी महापालिका निवडणुकीसाठी सतेज पाटलांना नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

कोल्हापूर महापालिकेवरील सतेज पाटलांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना प्रयत्नशील आहे. शिंदेंच्या शिवसेनेची जबाबदारी ही आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांच्यावर आहे.

भाजपचे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत

सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने भाजप आणि ताराराणी आघाडीतील काही नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेच प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे कोणताही प्रमुख चेहरा नसल्याने नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरल्याची चर्चा आहे.

या आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, उपमहापौर दिंगबर फराकटे, प्रकाश नाईकनवरे, अभिजित चव्हाण, रीना कांबळे, तात्या खेडकर आणि त्यांच्या पत्नी, गीता गुरव, अश्विनी बारामते, सचिन मोहिते(सुनंदा मोहिते), संभाजी जाधव, संगीता संजय सावंत, पूजा  नाईकनवरे, रेखा पाटील, जहांगीर पंडत, भरत लोखंडे

प्रमुख युवा चेहरे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!